राष्ट्रवादीला धक्का! एकनाथ खडसेंना ‘ईडी’ची नोटीस येणार?

भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी चौकशी होणार असल्याच्या चर्चा 

0

मुंबई ः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन व्यवहारप्रकणात ‘ईडी’ची नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि खडसे यांना मोठा धक्का बसा आहे. यासंबंधी एकनाथ खडसे इंडियन एक्सप्रेसशी म्हणाले की, “अजूनतरी आपल्या कोणतीही नोटीस मिळालेली नाही.”

“मला सूत्रांकडून कळलेलं आहे की, भोसरी जमीन व्यवहारप्रकरणात मला नोटीस येणार आहे. परंतु, अजूनतरी नोटीस आलेली नाही. ख्रिसमस सुट्टी असल्याने कदाचित नोटीस आली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेनं मला नोटीस पाठविली तरी मी चौकशीला समोरे जाण्यास तयार आहे”, असे एकनाथ खडसेंनी सांगितले आहे.

“माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी १०० कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे. या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मला आधीच क्लीन चीट दिली आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या आयोगाने केलेल्या चौकशीतही काही समोर आलं नव्हतं”, असे खडसे यांनी स्पष्ट केलेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.