पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना गोंधळ झाला. आणि मृतदेहाची आदलाबदल झाली. त्यामुळे चांगलीच धांदल उडाली आहे.
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांची कुमक वाढविली आहे.
वायसीएममधील डेडहाऊसमधून नेण्यात आलेल्या मृतदेहाची अदलाबदल झाली. नातेवाईक एकाचा मृतदेह घाईगडबडीत घेऊन गेले. त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील केले. पण, तो मृतदेह दुस-याच व्यक्तीचा होता.
अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक रुग्णालयात आले. पण, त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह दुस-यांनी नेल्याचे त्यांना समजले. आपल्या व्यक्तीच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.