पिंपरी : लहान मुलांच्या भांडणात गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या उच्चभ्रू सोसायटीत घुसून टोळक्याने राडा घातला. हातात पिस्तुल घेवून, दहशत माजवून, धमकी दिल्या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी आकाश सुखदेव ननावरे (२०, रा. लोढा, बेलमेडो) याने फिर्याद दिली आहे. प्रदीप जयप्रकाश सिंग (४०, रा.लोढा), चंदन सुरेंद्र सिंग (२१, रा. डांगे चौक, वाकड), आरमान कैलास बिडलाग (२३, रा. निगडी), सोमनाथ शंकर ढेरे (२४, रा. वाल्हेकरवाडी), लहान मुलासह इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोढा सोसायटीमध्ये राहण्यास असलेल्या एका लहान मुलाने प्रणव पुसावले याला धमकी दिली.यातून वाद वाढल्याने फोन करुन इतरांना बोलावले. यावेळी प्रदीप सिंग याने हातात रिव्हॉल्वर घेवून दहशत माजवली. तसेच लाथा बुक्याने मारहाण करुन, धमकी दिली. तपास शिरगाव पोलीस करत आहेत.