परंतु , कलाटे यांनी पक्षादेश डावलून आपल्या समर्थक मीनल यादव यांचे नाव दिल्याने त्यांच्या गटनेतेपदावर संक्रांत आली . गटनेतेपदी काम करत असताना स्वतःच्या मर्जीतील लोकांना पदे वाटून आपण पक्षशिस्तीचा भंग केला आहे . पक्षाचा आदेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवला.
त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर व विभागीय आयुक्तांकडे द्यावा, असा आदेश राऊत यांनी कलाटे यांना दिला आहे . त्यामुळे आज कलाटे यांच्या राजीनामा दिला .