चाकण येथील जुगार अड्ड्यावर छापा

0

पिंपरी : चाकण येथील खंडोबा माळ परिसरा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून आठ जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) दुपारी करण्यात आली.

पोलीस हवालदार सुनिल जगन्नाथ शिरसाठ यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबामाळ चाकण येथे काहीजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

खंडोबामाळ येथील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यामध्ये पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 34, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.