पिंपरी : पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पपलु रम्मी नावाच्या जुगार खेळणाऱ्या अड्यावर छापा टाकला. पथकाने या छाप्यामध्ये तब्बल 18 जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार (ता.3) रोजी हि कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील चऱ्होली गावातील पादुका वस्ती, नंदु घोलप चाळीमधील रुम नं.05 मध्ये काही इसम पपलु रम्मी नावाचा जुगार खेऴत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती होती. मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सापळा रचुन खोली वर छापा टाकला असता तेथे 01 लाख 58 हजार 200 रुपयांची रोख रक्कम, 01 लाख 42 हजाराचे 14 अँण्ड्रॉईड मोबाईल फोन, 01 हजार 120 रुपयांचे जुगार खेऴण्याचे साहित्य असा एकुण 03 लाख 01 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
पोलीसांनी तो सर्व माल जप्त करुन जुगार अड्डा चालक-मालकासह जुगार खेळणाऱ्या तब्बल 18 इसामांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद झालेल्या इसमांची नावे पुढील प्रमाणे – चालक मालक संतोष काळुराम लोखंडे (35 वर्ष, रा. मु.पो. सोळु, ता. खेड, जि. पुणे), संदिप निवृत्ती सांडभोर (38 वर्ष, रा. मु.पो. राक्षेवाडी, ता. राजगुरुनगर, ता.खेड, जि. पुणे), संतोष निवृत्ती बुट्टेपाटील (39 वर्ष, रा. मु.पो. वऱ्हाळे ता.खेड, जि. पुणे), अमोल मारुती माने (32 वर्ष, रा. चाकण चौक, घुंगरे आळी, आळंदी), संजय धुमसिंग बारेला (23 वर्ष, रा. कृष्णा हेरीटेज 305 ए संत नगर, भोसरी), रामनारायण भगवान राऊत (36 वर्ष, रा. तापकिर नगर, देहुफाटा, आळंदी), ऋषिकेश बालाजी चाफळे (30 वर्ष, रा. घुंडरे आळी, आळंदी), आसिफ फकिर शेख (25 वर्ष, रा. सर्व्हे नं. 204-205, सिद्धार्थ नगर, रामवाडी, पुणे), दिनेश रमेश देवकर (26 वर्ष, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी, पुणे), प्रशांत जगन्नाथ रेड्डी (32 वर्ष, रा. कृष्णकांत तापकिर चाळ, चऱ्होली फाटा, आळंदी), शुभम नितीन भालेराव (20 वर्ष, रा. कोंढवा रोड, विघ्नहर्ता नगर, लक्ष्मी निवास, कात्रज, पुणे), कानिफनाथ लक्ष्मण चोपडे (25 वर्ष, रा. गल्ली नं.4, शिवशंभो नगर, कात्रज), दिपक नरसिंगराव तुकदे (28 वर्ष, रा. ममता स्विट होम च्या वर दिघी), सुरज बाळासाहेब नाईक (28 वर्ष, रा. भारत माता नगर, दत्त कॉलनी, पुणे), सनी सुभाष भांडेकर (28 वर्ष, रा. नालंदा हौसिंग सोसायटी, बिल्डींग नं.13, फ्लॅट नं. 402, निगडी), सोमनाथ बबरुवन वजरकर (25 वर्ष, रा. ममता स्विट होमच्या वर दिघी), विशाल भालचंद्र भडकुंबे (21 वर्ष, रा. भारत माता नगर, सर्व्हे नं. 75, सहकार कॉलनी, दिघी) अशी गुन्हा नोंद होवुन अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.तर नंदु घोलप (पुर्ण नाव माहित नाही, वय-अंदाजे- 40 वर्ष, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उप-निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस उप-निरीक्षक धैर्यशील सोळंके, सहायक पोलीस फौजदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, सुनिल शिरसाट, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, योगेश तिडके यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.