स्पा सेंटरवर छापा; चार महिलांची सुटका

0

पुणे : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23) पिंपळे सौदागर येथील न्यून्ग थाई स्पा सेंटर येथे करण्यात आली.

स्पा मॅनेजर ओंकार विनायक जोशी उर्फ सत्यम गौडा (24, रा. दत्तवाडी, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याचा साथीदार स्पा चालक मालक नंदराम वैभव गोविंद (31, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग गस्त घालत असताना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे सौदागर येथे न्यून्ग थाई नावाच्या स्पा सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत स्पा मॅनेजर ओंकार याला अटक केली. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा 34 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून चार महाराष्ट्रीयन मुलींची सुटका केली आहे. पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.