जुगार अड्ड्यावर छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पिंपरी : भोसरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी (दि.12) साडेपाचच्या सुमारास जय मल्हार गॅरेजशेजारी, भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी अंगद आनंतराव राऊत (44, रा. मारूंजी गाव, मुळशी), गणेश भिकु जाधव (45, रा. पांडवनगर, भोसरी), मंगेश सखाराम अंभोरे (30, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), संतोषकुमार भोलानाथ जयस्वाल (42, रा. धावडे वस्ती), प्रविण मनोहर चव्हाण ( रा. चाकण) व दगडू पांडुरंग केदारी (रा. खराबवाडी, चाकण) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र भानुदास राठोड ( पोलीस हवालदार, भोसरी पोलीस ठाणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जुगार चालवित होते. कारवाईत पोलिसांनी त्यांच्याजवळील 1 लाख 44 हजार 245 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस हवालदार बोयणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.