वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे

0
पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला.

शहरात स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने छुप्या पध्दतीने अवैध धंदे सुरू आहेत. पण हे अवैध प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच दिसतात, असेच गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. अधिकाऱ्याना माहिती मिळते आणि त्यानंतर ते पथक पाठवून कारवाई करतात.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनला वारजे माळवाडी येथील रामनगर परिसरात रजपूत चहा समोरील सतीश बोडके यांच्या पडीक इमारतीत जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नवनियुक्त पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, एकनाथ कंधारे, दीपक मते, अनिल  शिंदे, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, हनुमंत गायकवाड, प्रकाश कट्टे यांच्या पथकाने याठिकाणी कारवाई केली. येथून 40 हजार रुपयांचा ऐवज टाकत, चौघांना पकडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.