पिंपरी: बंदिस्त जागेवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि सात जणांना तांब्यात घेतले आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांना माहिती मिळाली की , भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत भिमराव भोसले चौक , नेहरुनगर , पिपंरी , पुणे येथील चव्हाण टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स चा मालक चिंतामण चव्हाण हा त्याचे बंदिस्त असलेल्या लोखंडी कॅबीनचे ऑफिसमध्ये लोकांना एकत्र जमवुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी पैशावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळवित आहेत.
सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना सदर ठिकाणी तात्काळ टीम पाठवुन कारवाई करण्याचे आदेश दिले . उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे व पोलीस अंमलदार यांनी छापा टाकला. त्या ठिकाणी १५ हजार रुपये, तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी वापरलेले सुट्टे पत्ते, ४१ हजार रुपयांचे ०७ मोबाईल असा एकुण ५६ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला.
चिंतामण सुरेश चव्हाण (३७, रा . ए -१ , मंजील नेहरुनगर , साळवेकर हॉस्पीटल समोर , पिंपरी वाघेरे , पिंपरी , पुणे, जुगार चालक – मालक ), शेखर सुरेश मोहिते वय (३३, रा . विजय प्रभु हौसींग सोसायटी , पिंपरी , पुणे), इसाक इकबाल सय्यद (४८, रा . भागिरथी कॉम्पलॅक्स , रेल्वे गेटसमोर , कासारवाडी , पुणे), रामकृष्ण उत्तमराव तुपे (४७, रा . प्लॉट नंबर २ ९ १ , सेक्टर नंबर १ , इंद्रायणीनगर , महाराष्ट्र कॉलणी , भोसरी , पुणे), सुनिल मलीनाथ सोमासे (४६, रा . सर्व्हे नंबर १०१ , डी डी पाटील चाळ , नेहरुनगर , शर्मा केबल शेजारी , पिंपरी वाघेरे , पिंपरी , पुणे ), राजेंद्र शंकर सोमासे (४६, रा . सर्व्हे नंबर १०१ , डी डी पाटील चाळ , नेहरुनगर , शर्मा केबल शेजारी , पिंपरी वाघेरे , पिंपरी , पुणे), आबासो बापुराव तुपे (३७, रा . कर्मयोग हौसींग सोसायटी , कामगारनगर , पिंपरी , पुणे ) यांचेविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१/२०२२ महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , उपायुक्त ( गुन्हे ) डॉ . काकासाहेब डोळे , सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक शदेवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाट , अमोल साडेकर , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , दिपक शिरसाट , अतुल लोखंडे , सोनाली माने यांनी केली आहे .