वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेलवर छापा; दोघांना अटक

0

पिंपरी : हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारून पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक केलेल्या दोघांसह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18 मे) दुपारी पावणे चार वाजता लक्ष्मी चौकाजवळ हिंजवडी येथे हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव येथे गुन्हे शाखेने केली आहे.

 

शुभम राजेंद्र ढेरे (28, रा. नेकनूर, ता. जि. बीड), योगेंद्र बाळू कुंभार (27, रा. हिंजवडी) या दोघांना अटक केली आहे. तर सुनील मदार उर्फ राहुल, उर्फ जीजू, संजीत अमरनाथ सिंग, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम आणि योगेंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. लॉजमध्ये अडकवून ठेऊन त्या महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या प्रकरणी माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी बुधवारी दुपारी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.