पुणे : मुंढवा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारुन अवैधपणे हुक्का विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली आहे. हॉटेल बॉटल फॉरेस्ट, ताडीगुत्ता चौक, धायरकर वस्ती, मुंढवा, पुणे व हॉटेल ब्ल्यु शॅक धायरकर कॉलनी , पिंगळे वस्ती मुंढवा येथे कारवाई करुन 10 जणांवर गुन्हा दाखल करत 78 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी हॉटेल बॉटल फॉरेस्ट हॉटेल मालक रोहित किसन (29, रा. घोरपडी गाव), हॉटेल व्यवस्थापक देवराम मांगिलाल जैन (32, रा. रविवार पेठ), वेटर सरोज लालमुखीया कुमार (19, रा. पाषाण), गोविंद सुरेंद्र मुखीया (19, रा. मुंढवा), पवन मुखीया जोगिंदर मखीया (22, रा. मुंढवा) हे ग्राहकांना अवैधरीत्या हुक्का पुरवून त्याठिकाणी हुक्का बार चालवत होते. त्यांच्याकडून 33 हजार 300 रुपयांचे हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच हॉटेल ब्ल्यु शॅक या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत हॉटेल चालक अभय दिवाकर मिश्रा (41, रा. कुर्ला पश्चिम), ग्राहकांना सर्व्हिस देणारे अशोककुमार गौड (22, रा. धायरकर वस्ती, ताडीगुत्ता, पुणे), गोलु निहरी रामकुमार (20, रा. धायरकर वस्ती, पुणे, मुळ रा. उत्तर प्रदेश), बाबु कालु शेख (28, रा. धायरकर वस्ती, पुणे मुळ रा. उडीसा), भरत उत्तीमलाल कामत (39, रा. धायरकर वस्ती, पुणे मुळ रा. बिहार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हे ग्राहकांना तंबाखुजन्य हुक्का पुरवत होते. त्यांच्याकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईतील आरोपींवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे , महिला सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर पोलीस अंमलदार संदिप जाधव, संतोष देशपांडे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, चेतन गायकवाड, रेहाना शेख, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, मारुती पारधी, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.