चाकण : चाकण पोलिसांनी खेड तालुक्यातील वाकी गावच्या हद्दीत वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या साई पॅलेस नावाच्या लॉजवर छापा मारला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि. 16) दुपारी केली.
रविंद्र किसन बोंबले (40), अजित तुकाराम बोंबले (42, दोघे रा. वेताळे, ता. खेड), नवनाथ रामचंद्र लोखंडे (30, रा. घेरडे, ता. सांगोला, जि. सोलापूर), पंडित सुरेश सोनवणे (33, रा. सायगाव, ता. खेड), अक्षय नंदू दात्रक (24, रा. करुले, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर खराटे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी वाकी गावातील साई पॅलेस या लॉजमध्ये ठेवले. ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. याबाबत माहिती मिळाल्याने चाकण पोलिसांनी लॉजवर कारवाई केली. यात पोलिसांनी पाच जणांना अटक करत दोन महिलांची सुटका केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
‘स्पा आणि वेश्या व्यवसाय शहराला लागलेली कीड’ अशी सविस्तर बातमी talkmaharashtra.com मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता सर्व ठिकाणी छापे टाकून कारवाई सत्र सुरु करण्यात आलेले आहे.