खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापे; 23 जणांवर कारवाई; लाखोंचा ऐवज जप्त

0

पुणे : शहराच्या मध्यवस्तीत खुलेआम सुरू असणार्‍या दोन जुगार अड्डयावर पोलिसांनी छापे टाकले. यामध्ये तब्बल 23 जणांवर कारवाई करुन 1 लाख 34 हजार 690 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.

खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत भवानी पेठेत खुलेआम 3 पत्ती जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्तांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सदरील जुगार आड्डयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. शनिवारी रात्री 11.50 वाजता कारवाईला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी जुगार अड्डयामध्ये तब्बल 22 जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी जुगार अड्डयामधील रोकड, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य जप्त केला आहे.

पोलिस हवालदार दत्तात्रय मच्छिंद्र जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अन्वय युसुफ खान (56, रा. चमनशहा दर्गापाठीमागे, भवानी पेठ), केतन विजय खैरमोडे (35, रा. 971, कसबा पेठ, भोईआळी), फैजल अन्वर शेख (27, रा. भैरवनाथ मंदिर, भाग्योदय नगर, गल्ली नंबर 27, कोंढवा खुर्द), पांडुरंग गोरख सोनटक्के (45, रा. पवार बाग, बीटी कवडे रोड, घोरपडी गाव), वसीम मुबारक शेख (36, रा. काशेवाडी पोलिस चौकीजवळ, भवानी पेठ), इरफान गनी शेख (37, रा. 722, रविवार पेठ), समीर कादर शेख (46, रा. 53, गणेश पेठ), मुज्जु अन्वर खान (30, रा. चमनशहा दर्गाशेजारी, काशेवाडी, भवानी पेठ), शैलेश रमेश भालेराव (35, रा. 553, भवानी पेठ), आलीम अब्दुल गनीम मोमीन (45, रा. 281, गुरूवार पेठ), विजय रूपचंद ओसवाल (45, रा. शंकरशेठ रोड, मिरा सोसायटीच्या पाठीमागे, बी/12/23), अब्बास अलीउद्दीन शेख (33, रा. चमनशहा दर्गाजवळ, काशेवाडी, भवानी पेठ), मोईन इस्माईल खान (21, रा. 1256, रविवार पेठ), संतोष धर्मा बावले (21, रा. 1256, रविवार पेठ), वसीम गुलाम मोहम्मद शेख (33, रा. डीपी/3, लोहिया नगर), सतीश बबन उकरंडे (42, रा. बीपी/78, काशेवाडी, भवानी पेठ), प्रकाश लक्ष्मण कांबळे (34, रा. 1049, भवानी पेठ), अफजल कासम पटेल (52, रा. काशेवाडी, भवानी पेठ, चमनशहा दर्गा चौक), पापा फकरूद्दीन शेख (49, रा. 553, काशेवाडी, भवानी पेठ), सुनिल दत्ता अवघडे (55, रा. सर्व्हे नं. 214, दांडेकर पूल), भाऊ श्रावण शिरसाठ (45, रा. 1049, न्यु नाना पेठ), इस्माईल जब्बार बागवान (49, रा. सर्व्हे नं. 42, काशेवाडी, भवानी पेठ) आणि निजाम सलीम शेख (27, रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ, होप दवाखान्याजवळ) यांना अटक करण्यात आली.

अन्वय युसुफ खान (56) हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बेकायदेशीररित्या 3 पत्ती जुगार चालवित होता तर इतर 22 जण तेथे जुगार खेळत होते. पोलिसांनी तब्बल 19 मोबाईल जप्त केले असून एकुण 1 लाख 34 हजार 690 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त (झोन-1) प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.