पिंपरी : दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.ही कारवाई गुरुवारी (दि. 21) दुपारी दिघी-भोसरी रोडवरील राजरत्न लॉज येथे करण्यात आली. पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला.
याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाने लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची सुटका करून दलाल महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा 9 हजार 120 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.