स्पा सेंटरवर छापा; दोन महिलांवर गुन्हा दाखल

0
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास भुमकर चौक वाकड येथे करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला आरोपी (रा. अहमदनगर), महिला आरोपी (रा. तळेगाव दाभाडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुमकर चौक, वाकड येथील क्रॉसरोड मॉल येथे असलेल्या स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपी दोन महिला पीडित तीन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.