महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार पावसाचं आगमन

0

मुंबई : एकिकडे राज्यातील काही भागात उन्हाचा कडाका लागला आहेत. तर दुसरीकडे पावसाचीही परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवस आधीच सोमवारी मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात पावसाचं आगमन कधी होतंय. याची उत्सुकता लागली आहे. तर मान्सूनचे अंदमानात आगमन झालेलं असतानाच आता केरळातही तो 25 ते 27 मे या दिवसा दरम्यान पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. मात्र, हा मान्सून नसून, अवकाळी पाऊस आहे. परिणामी या पावसाला मान्सून समजण्याची चूक करु नका कारण, या पावसानंतर तापमानात वाढ झाल्याचे निरिक्षणास आल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मान्सूनसाठी सर्व परिस्थिती पूरक असल्यामुळे त्याचा प्रवास हा अतिशय वेगाने होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. केरळमध्ये आल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात येण्यास फार वेळ जाणार नाही असं देखील सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा आणि त्यांना मिळालेली गती पाहता 10 जून ऐवजी तळकोकण आणि बहुतांश कोकण किनारपट्टी भागात मान्सून 2 जूनला धडकणार असल्याची चिन्हे आहेत. असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.