अमरावती : राज्यातील अनेक नेत्यांच्या चौकश्या लावण्यात आल्या. यामध्ये शरद पवार, राज ठाकरे, प्रताप सरनाईकांवर चौकशी लावली. मग दानवे काय शुद्ध घीवाले आहेत काय?, असा सवाल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
ईडीची चौकशी लावून केंद्र सरकार लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करत आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
भाजपच्या काही लोकांनी कित्येक मोठी संपत्ती जमा केली आहे, एकाही भाजपच्या नेत्यावर ईडीची चौकशी का लागत नाही?, असं बच्चू कडू म्हणाले.
केंद्राकडून याचं राजकारण होत आहे. जो बोलण्याचा प्रयत्न करतोय, त्याला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही आणि घटनेची पायमल्ली करण्याचा प्रकार निश्चितच होत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो, असं ही बच्चू कडू म्हणाले आहेत.