पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील 21 मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेने पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.
नदीपात्रात डेक्कन येथे राज ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन मनसेने केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी देखील मागण्यात आली होती. मात्र त्यासाठी पोलिसांनी काही अटी सांगितल्या होत्या. त्यानंतर मनसेने ही सभा पावसाचे कारण देत रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्र डेक्कन पोलिसांना देण्यात आले.
राज ठाकरे हे पुण्यात होते. मात्र सभा रद्द होताच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अन्यथा त्यांचा चार-पाच दिवस पुण्यात मुक्काम ठरला होता.