पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील

0

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली राज्याचे नोंदणी महानिरीक्षक (आयजीआर) पदावर झाली आहे. तर राजेश पाटील यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त म्हणून गेले पावणे चार वर्षे हर्डीकर हे कायम आहेत. राज्यात भाजपाची सत्ता जाऊन महाआघाडीची सत्ता आली त्यावेळेपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची कार्यपध्दती पाहून त्यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय केला. कोरोना काळात देशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती गेले आठ महिने सुट्टी न घेता अहोरात्र कष्ठ घेऊन ज्या पध्दतीने हाताळली त्याबद्दल सर्वत्र त्यांची वाहव्वा सुरू आहे.

स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली.

ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.