राज्यसभा निवडणूक : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

0

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. सहाव्या जागेसाठीची लढत अधिक चुरशीची असल्याने एक एक मतांची गरज लागणार आहे. सहावी जागा निवडून येण्यासाठी आघाडी सरकार आणि भाजपला अपक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. असं असलं तरी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही.’ असं स्पष्ट केलं आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष आमदारांना त्यांचे मतदान कुणाला दाखवता येणार नाही. असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीला एक धक्का बसला आहे. दरम्यान, अपक्ष आमदार ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्या पक्षाच्या प्रतिनिधीला त्याने त्याचे मत दाखवणे बंधनकारक असेल का? अशी विचारणा विधानमंडळ कार्यालयाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यावर आयोगानं निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पक्षांच्या आमदारांना त्यांचे मत तिथे उपस्थित पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवूनच करावे लागते आणि ते दाखविले नाही किंवा पक्षाचा व्हिप झुगारून इतर उमेदवारास मत दिले तर ते मत अवैध ठरते असा नियम आहे. या दरम्यान अपक्ष आमदारांच्या मतदानाबाबत आयोगाने स्पष्ट केले की, ते कोणालाही दाखवून मत करू शकत नाहीत आणि तसे केले तर त्यांचे मत बाद ठरते. त्यामुळे अपक्ष आमदारांना व्हिप लागू होणार नाही व कुणाला दाखवून मत देता येत नाही. असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.