पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित पोलिस निरीक्षकावर कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं आहे. याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित वरिष्ठ निरीक्षकावरील कारवाईस दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासुन भारती विद्यापीठ परिसरात तसेच कात्रज भागात मोठया प्रमाणावर अवैध धंद्दे सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना मिळाली होती. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले काही ‘राज’ अवैध धंद्देवाल्यांकडून ‘वगैरे-वगैरे’ मार्गातून मलई गोळा करण्यात मग्न असल्याची देखील चर्चा सुरू आहे. दरम्यान, परिसरात अवैध धंद्दे सुरू असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांवर कारवाई केली आहे. त्यांना आगामी 7 दिवसांसाठी नियंत्रण कक्षाशी सलग्न करण्यात आले आहे.
कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरातील धंद्यांबाबत वेळोवेळी कानावर येत होतं. अवैध धंद्दे सुरू असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी थेट वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केल्यानं अनेक अधिकारी तसेच कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस आयुक्तांच्या या कारवाईमुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.