भाजप कार्यालयात कोंबड्या सोडून राणे यांचा निषेध

0
पुणे : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसून लागले आहेत. पुण्यात शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडून राणे यांचा निषेध केला आहे.
शिवसैनिक आक्रमक झाले असून आंदोलन, पोस्टरबाजी करत आहेत. नाशिकमधील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर दगडफेक करून त्याची तोडफोड केली
पुण्यामध्ये शिवसेना कार्यकर्ते कोंबड्या घेऊन आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजीही करत आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी भाजप कार्यलयात कोंबड्या सोडून राणे यांचा निषेध केला आहे.
नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक
संतापलेल्या शिवसैनिकांनी नाशिकमध्ये भाजपचे कार्यालयाच फोडले आहे. जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. शिवसैनिक गाडीत बसून आले यानंतर शिवसैनिकांवर या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. दरम्यान शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत होते. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात उत्तम प्रकारे सावरले आहे. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल असे शिवसैनिकांनी म्हटले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.