मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

0
मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकणारे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. आता परमबीर सिंह यांच्याविरोधात यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलीस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. दरम्यान, परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मलबार हिल परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचे भाडे दिले नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. परमबीर सिंह यांनी 24 लाख रुपये भाडे थकवल्याचा आरोप आहे.
परमबीर सिंह हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यांची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती समोर लाई आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी परमबीर सिंह यांना लवकरच चौकशीला बोलावणार असून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना याबद्दल समन्स सुद्धा बजावण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.