गृहमंत्र्यांच्या नावे खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल

0

अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या नावाने शहरातील नामांकित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांला दहा लाखांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेतील 5 तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

वाशीम बायपास परिसरातील विजय ट्रान्सपोर्टचे संचालक अब्दुल आसिफ यांच्याकडील वाहनांची तपासणी करण्याच्या नावाखाली तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ५ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गृहमंत्र्यांच्या नावानी 10 लाखांची खंडणी मागितल्याची फिर्याद अब्दुल आसिफ यांनी केली होती.

अब्दुल आसिफ यांचे 3 ट्रक बळजबरीने एलसीबी आवारात गैरकायदेशीर उभे करून ठेवले आणि गुन्हे दाखल करण्याची धमकी देत राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नावाने 10 लाखांची मागणी केल्याचे आसिफ यांनी तक्रारीत म्हटले होते.

आसिफ यांनी या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून सातत्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती. परंतु, कारवाई न झाल्याने त्यांनी याविरुद्ध कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली. तर, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून तथ्य व परिस्थितिजन्य पुरावे स्वीकार्य करुन जयंता श्रीराम सोनटक्के, किशोर काशीनाथ सोनावणे, वसिमोद्दिन अलिमोद्दिन, अश्विन हरिप्रसाद मिश्रा व अन्य एकाविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.