‘थेरगाव क्वीन’चे अटकेच्या व्हिडीओवर ‘रॅप सॉंग’ इंस्टाग्रामवर

0

पिंपरी : 302 च्या व्यक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘थेरगाव क्वीन’ साक्षी श्रीमल हिने स्वतःच्या अटकेच्या व्हिडीओवर रॅप सॉंग बनवले आहे. पोलिसांवरच तयार केलेलं हे रॅप सॉंग इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

थेरगाव क्वीन’ या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन अश्लील भाषेतील आणि धमक्या देणारे व्हिडिओ टाकल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती. मात्र जामीन मिळताच पुन्हा तिने इंस्टाग्राम सुरु केले आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर घेऊन जात असताना आत्ताचा व्हिडिओ रिल्स बनवून आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे.

मोठी हस्ती आहे आपण,  टिनपाट थोडीच आहे.. ढगात आहे ना आपण, खालनं कितीपण दगड मारू द्या, आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कोणाची दगडं, अख्या ब्रह्मांडाला शनी बोलून एकटा मी बास होतो, आमच्याबरोबर चालण्याचा बी त्रास होतो, निंद हराम करतो, असं गाणं बॅकग्राउंडला वापरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.