लग्नाचे अमिष दाखवून महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार

0

मुंबई : लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्यानेच पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संदीप शिवाजी पिसे असं सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे . पिसे कफ परेड पोलीस ठाण्यात एपीआय म्हणून कार्यरत असून गेल्या 8 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवल्यानंतर गेल्या महिन्यात त्याने अन्य तरुणीशी विवाह केल्याने महिला पाेलीस उपनिरीक्षकाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

2013 मध्ये दोघे एका ठिकाणी नियुक्तीला होते. त्यावेळी पिसे आणि तिचे प्रेमसंबंध जुळून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्यानंतर महिला उपनिरीक्षकाची पुण्याला बदली झाली मात्र दोघंही एकमेंकांच्या संपर्कात होते. डोंगरी पोलिसांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.