कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
येरवडा कारागृहात जामीनावर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कदमवाक वस्ती या ठिकाणी हा प्रकार घडला. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन सुभाष कदम (वय 45) असे अटल गुन्हेगाराचे नाव आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सचिन कदम याच्यावरून स्टेशन येथे एका गुन्हेगाराचा खून केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्याच्या आरोपातून येरवडा कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटून बाहेर आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. यावेळी सचिन कदम हा या घरांमध्ये जबरदस्तीने घुसला आणि तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तिचे तोंड दाबले आणि ठार मारण्याची धमकी दिली. तरीही मुलीने विरोध केल्यानंतर आरोपीने पळ काढला.
आरोपी पळून गेल्यानंतर पीडित मुलीने नातेवाईकांना फोन करून घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनीही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.