पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता पुणे शहरातील पुणे शहरातील एका प्रसिध्द शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या शिक्षिकेवर सोबत काम करणाऱ्या शिक्षकाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
आरोपी शिक्षकाने शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या आरोपी शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने शिक्षिकेकडून कर्ज फेडण्यासाठी 5 लाख घेऊन फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे.
विनोद क्षीरसागर असे अटक केलेल्याचे शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय शिक्षिकेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही शिक्षक असून एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरी करतात. आरोपी विनोदने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिच्याकडे 11 लाख रूपयांची मागणी करून 5 लाख रूपये बॅकेचे कर्ज फेडण्यासाठी घेऊन तिची फसवणूक केली.
दरम्यान फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.