पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मागील दीड वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आरोपीने पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवताना तिची आर्थिक फसवणूक केल्याची. ही तक्रारीत म्हटले आहे
संदीप बळीराम वाघमारे (रा. वरळी) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. काही दिवसानंतर पुन्हा आपले लग्न झाले असल्याचे भासवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या काळात आरोपीने पीडित महिलेच्या आई-वडिलांकडून रोख अडीच लाख रुपये आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने देखील घेतले आणि त्यांची फसवणूक केली.
दरम्यान फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटकही केली आहे. आरोपी पोलिस कर्मचारी मुंबई पोलिस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.