वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून तरुणीवर बलात्कार

0

पिंपरी : वाढदिवसाच्या पार्टीला बोलावुन इंजिनियर तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वाकड, भूमकर चौकात घडली आहे.

निशांत हरीश चंदनानी (३४, रा. रतलाम, मध्य प्रदेश) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने सोमवारी (दि. २४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनिअर असून ती घटस्फोटित आहे. त्याच प्रमाणे आरोपी देखील इंजिनिअर असून घटस्फोटित आहे. दुसरे लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाईटवरून आरोपीने पीडित तरुणी सोबत ओळख केली. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली.

त्यानंतर आरोपीने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीसाठी पीडित तरुणीला बोलावले. रात्री उशिरा पार्टी संपली. तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवून घेतले. त्यानंतर फिर्यादी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.