हात बांधून तरुणीवर बलात्कार

0

पुणे : भांडणाच्या रागातून तरुणीचे हात बांधून तिच्या तोंडावर गांजाचा धूर सोडून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. हा संतापजनक प्रकार पुण्यातील उंड्री परिसरात घडला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी १७ मार्च रोजी घडला.

श्रवण राजेंद्र अंकुशे (२२, रा. उंड्री) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून श्रवण आणि पीडित तरुणीचे प्रेम संबंध होते. मात्र, आरोपी तरुणाचे आणखी काहीमुलींसोबत संबंध असल्याचे पीडित तरुणीला समजले होते. त्यानंतर पीडितेने श्रवणसोबत असलेले प्रेम संबंध तोडले होते. त्यानंतरआरोपी एक दिवस तिच्या घरी आला आणि तिला गांजा पिण्यास सांगितले. मात्र, गांजा पिण्यास तिने नकार दिला. तेव्हा श्रवण यानेघराचा दरवाजा लावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार दिल्यावर त्याने फिर्यादीचे हात कपड्याने बांधले. गांजाओढून त्याचा धूर त्याने तोंडाने फिर्यादीचे नाकात सोडला. तसेच तिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. नाका, तोंडात गांजाचा धूर गेल्यानेफिर्यादी यांना गुंगी आली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

ज्यावेळी तिची गुंगी उतरली त्यावेळी आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने कोंढवा पोलीस स्टेशन गाठलेआणि आरोपी विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.