बोलण्याचा बहाणा करुन तरुणीवर बलात्कार

0

पिंपरी : तरुणीशी बोलण्याचा बहाणा करून एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार 19 ऑगस्ट रोजी सकाळी वाघजाईनगर, खराबवडी येथे घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

मोहम्मद इस्तियाक ऊर्फ छोटू मोहम्मद हनीफ फकीर (19, रा. अशोक इंडस्ट्रीज कंपनीच्या खोल्यांमध्ये, मूळ रा. कानपूर उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी तरुणीला, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, असे म्हणून वाघजाई नगर खराबवडी येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत तरुणीने 20 दिवसांनी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तरुणाला तात्काळ अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.