पुणे : ओळखीच्या तरुणीला गावाकडून बोलावून तिच्यावर वेळोवे बलात्कार केला. तसेच व्हिडिओ तयार करून ते व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी एका बावीस वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हादाखल केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने 2018 मध्ये फिर्यादीला हाताचे ऑपरेशन असल्याचे सांगून मदत करण्यासाठी म्हणून पुण्यात आणले होते. त्यानंतर तिला पुण्यातील मित्रांच्या रूमवर घेऊन जात बलात्कार केला आणि त्याचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पंधरा हजार रुपये ही आरोपीने घेतले होते. हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला तर ठार मारेल आणि व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी आरोपी करून वारंवार पीडित तरुणीला दिली जात होते. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित तरुणीने अखेर पोलिसात तक्रार दिली. तपास पोलीस करत आहेत.