मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना ‘कोरोना’ची लागण

0
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन आहेत. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता रश्मी ठाकरे rashmi thackeray यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाने मुख्यमंत्र्यांच्या घरीदेखील शिरकाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या कोरोनाला आळा घालण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.