मुंबई ः “दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे-जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा प्रयत्न काही जण करतायत. हे देशातल्या जनतेला कळलं आहे. राऊत साहेब जे बोलले म्हणजे तथ्य असणार आहे.”, असे मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ईडीच्या मुद्द्यांवरून मांडले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या घरामध्ये ई़डीच्या नोटीसा सारख्या येतच आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीची धाड पडली. नंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतीच ईडीची चौकशीसाठी नोटीस आली आहे आणि आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनादेखील ईडीची नोटीस आली आहे, यावरून राजकीय वर्तुळात चांगलंच वादळ पेटलं आहे.भाजपा आणि शिवसेनेच्या नेते कार्यकर्ते आमने सामने आल्याचे दिसत आहेत.
संजय राऊत म्हणाले…
मागील वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात