पुणे : पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे याच्या पत्नीला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रवींद्र बर्हाटे फरार आहे. पोलिस त्याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. दरम्यान, बर्हाटे याची पत्नी त्याच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत सखोल चौकशी आणि इतर तपासासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बर्हाटेच्या पत्नीला अटक केली आहे. त्याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती दिली आहे..
संगीता रवींद्र बर्हाटे हिला अटक करण्यात आली आहे. रवींद्र बऱ्हाटे आणि इतर काही जणांवर शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. फसवणूक, खंडणी आणि इतर कलमान्वये हे गुन्हे दाखल झालेले आहेत. पोलिसांनी रवींद्र बर्हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई देखील कली आहे. बर्हाटे गेल्या काही महिन्यांपासून फरार आहे. त्याच्या गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, आज (बुधवार) पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बर्हाटे याच्या पत्नी संगीता बर्हाटे हिला अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी माहिती दिली आहे. संगीता बर्हाटे हिला अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.