नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार आहे, परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजारांची नोट बाजारात आली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.
आरबीआयने 2019 पासून 2000 च्या नोटांची छपाई बंद केली आहे. आरबीआयने बँकांना या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका वेळी केवळ 20,000 रुपये मूल्याच्या नोटाच बदलता येतील. तर बँका आतापासूनच 2000 च्या नोटा ग्राहकांना देणार नाही.