कंपनीत राहतो सांगून दुसर्‍या महिलेसोबत वास्तव

0

पुणे : लॉकडाऊनच्या काळातील अनेक गोष्टी बाहेर पडत आहेत. लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन एका नवरोबाने कामाच्या ठिकाणी राहत असल्याचे सांगून दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी रामवाडी येथील एका ३७ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती अभिजित जाधव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित जाधव हा त्याच्या पत्नीला किरकोळ कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन शारीरीक छळ करीत होता. फिर्यादीच्या पतीने लॉकडाऊनच्या काळात घरी न येता कामाचे ठिकाणी राहत असल्याचे सांगितले.

त्या कालावधीत त्याने एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले. या महिलेस व तिच्या दोन मुलांना बेकायदेशीरपणे घरात आणले. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. जबरदस्तीने घरातून बाहेर काढले. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.