पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा नोकरभरती काढण्यात आली आहे. विविध विभागांतील ब आणि क गटातील 16 पदांच्या 386 जागा भरण्यासाठी सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये तब्बल 1 लाख 30 हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत.
राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 386 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याकरिता 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेतपर्यंत मुदत होती. त्या मुदतीमध्ये विविध पदासांठी 1 लाख 30 हजार 470 उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 84 हजार 847 उमेदवारांनी परीक्षा शुल्क जमा केले आहे. तर उर्वरित 45 हजार 623 उमेदवारांनी अद्याप परीक्षा शुल्क भरले नाही. त्या उमेदवारांसाठी 26 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
या भरतीमध्ये लिपिकाच्या 213 जागांसाठी सर्वाधिक 51 हजार 161, तर कनिष्ठ अभियंत्याच्या 75 जागांसाठी
तब्बस 43 हजार 412 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या नोकरभरतीसाठी येत्या नोव्हेंबरअखेर परिक्षा घेतली जाणार
आहे. ही परिक्षा टीएससी कंपनीमार्फत होणार आहे.