पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनेक पदांसाठी भरती

0

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या संकेतस्थळावर (लिंकवर) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 09 डिसेंबर 2022 आहे.

कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी तब्बल 64 जागा रिक्त आहेत. पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार एमबीबीएसपर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव पाहिजे. पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

या अर्जासाठी बायोडाटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, वाहन परवाना), पासपोर्ट साइझ रंगीत फोटो आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत https://www.ddhspune.com/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.