यंदा १५० ऐवजी २०० आयपीएसची भरती

0

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेतील भरतीची संख्या सिव्हील सेवा परीक्षेपासून १५० वरून २०० पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली.

जनगणनेवर बोलताना ते म्हणाले, जनगणना २०२१चे आयोजन कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. आतापर्यंत, सरकारने राष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी तयार करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सोबत २०२१ च्या भारतीय जनगणनेच्या अभ्यासासाठी सरकारने ८७५४.२३ कोटी रुपयांचे वाटप मंजूर केल्याची माहितीही राय यांनी दिली.

सरकार जातीवर आधारित जनगणनेचा विचार करत आहे का या प्रश्नावर नित्यानंद राय म्हणाले, भारत सरकारने स्वातंत्र्यानंतरच्या जनगणनेमध्ये एसटी व एसटी वगळता इतर जातीनिहाय लोकसंख्येची गणना केलेली नाही. गेल्या पाच वर्षांत ४,८४४ लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.