मुंबई : राज्यातील नोकरभरती प्रक्रियेला अखेर राज्यात सुरुवात झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या विभागात सुमारे 13 हजार 800 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजारहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. तर, या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात 7 हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजार 297 पदांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे.
आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल 13 हजार 800 पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे. एकिकडे भरतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरीही मराठा नेते मात्र तूर्तास नोकरभरती होऊ नये यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं राजकीय तेढही येथे निर्माण केली जाऊ शकते.
28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती राज्यात एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यावेळी नव्यानं अर्ज करायला नाही आहे. मराठा समाजाच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या अर्जदारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नव्यानं प्रमाणपत्र घेऊन पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.