पिंपरी : हातात कोयता घेऊन रिल करणे एका महाशयाला चांगलेच महागात पडले असून त्यांची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १३) दुपारी गुजरनगर थेरगाव येथे करण्यात आली.
शुभम अभिमान जाधव (21, रा. गुजरनगर थेरगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम जाधव यांने हातात कोयता घेऊन एक व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शस्त्र विरोधी पथकाने त्याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.