नव्या वर्षापासून निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याची शक्यता 

0

नवी दिल्ली ः ”मोदी सरकार नव्या वर्षापासून म्हणजेच जानेवारी २०२१ पासून बांगला देश आणि पाकिस्तानच्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याची शक्यता आहे”, असे मत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केले आहे.

उत्तर २४ परगणा येथे पार्टीच्या ‘आर नोय अन्याय’ अभियानानिमित्ताने विजयवर्गीत बोलत होते. यावेळी शेजारील देशांमधील आपल्या देशात येणाऱ्या निर्वासितांना नागरिकत्व देणे याच प्रामाणिक हेतूने ‘सीएए’ला मंजूरी मिळाली आहे. प. बंगालमधील निर्वासितांना पहिल्यांदा नागरिकत्व देण्यास भाजपा उस्तुक आहे. तसेच प. बंगालच्या टीएमसी सरकारवर निर्वासितांबद्दल सहानुभूती नसल्याचा आरोप केला.

विजयवर्गीय यांच्यावर टीका करताना टीएमसीचे नेते फिरहद हकिम म्हणाले की, ”नागरिकत्व देण्यामागे भाजपाचे हेतू काय, भारताचे नागरिक नाहीत असे  म्हणता तर, दरवर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदान कसे करतात? भाजपाने प. बंगालमधील लोकांना फसविणे थांबवावे.”

Leave A Reply

Your email address will not be published.