सुपारी देऊनच रेखा जरे यांची हत्या 

0

अहमदनगर ः यशस्वीनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून उघड करण्यात आलेली आहे.

या प्रकरणात तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन कोल्हार तर, एक जण केडगाव येथील आहे. सुपारी देऊन रेखा जरे यांची हत्या करण्यात आली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालेले आहे.
जातेगाव घाटशिवार येथे सोमवारी (३० नोव्हे) रात्री रेखा जरे यांचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झालेले होते. पोलिसांची काही पथके रवाना करण्यात आलेली होती. शेवटी कोल्हारमध्ये दोघांना आणि कोल्हापूरमधून एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक तपासात ही हत्या सुपारी देऊन केल्याचे उघड केलेले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.