टीव्ही सिरीयल अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची सुटका

0

मुंबई : टीव्ही सिरीयल मधील अभिनेत्री तसेच मॉडेल्स यांच्याकडुन सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. तीन महिलांची सुटका करुन एका दलाल महिलेस अटक केली. ही कारवाई मुंबईतल्या घाटकोपर परिसरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष 7 ने केली आहे.

कविता भोसले या दलाल महिलेला अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेच्या संपर्कात अनेक मॉडेल्स आणि कलाकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात एक सेक्स रॅकेट सक्रिय असून त्यात वेश्या व्यवसायासाठी मॉडल्स आणि अभिनेत्रींचा वापर केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅकेटच्या सूत्रधाराचा पत्ता लागलेला नाही, तो फरार आहे. बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसांनी सिनेसृष्टीतील कलाकार किंवा मॉडेलची मागणी दलाल महिलेकडे केली. तिचा विश्वास संपादन झाल्यानंतर एका रात्रीसाठी 55 हजार रुपयांची मागणी केली.

त्या महिलेने ग्राहक बनलेल्या पोलिसाला तीन महिला दाखवले. यात एक भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे, तर अन्य दोन मॉडेल्स आहेत. दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये ती महिला या अभिनेत्री आणि मुलींना दाखवत होती, त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारली.

Leave A Reply

Your email address will not be published.