ठाकरे गटाला दिलासा : न्यायालयाने याचिका स्वीकारली, धनुष्यबाणावर होणार सुनावणी

0

मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर ही सुनावणी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे वाचन ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केले आहे. त्यानंतर नीरज कौल शिंदे गटातर्फे बाजू मांडत आहेत.

निवडणूक आयोगाने पक्ष नाव व धनुष्यबाणाबाबत दिलेला निर्णय चुकीचा आहे, असा दावा ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर आज स्वतंत्र बेंच समोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीशांच्याच अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठ याप्रकरणी सुनावणी घेणार आहे. आधी शिंदे गटाच्या वतीने अ‌ॅड. हरीश साळवे हे बाजू मांडतील. त्यानंतर शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या आक्षेपावर ठाकरे गटाची बाजू न्यायालयात ऐकली जाईल.

ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल मांडत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला. त्याबाबत बाजू मांडली. यादरम्यान निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला दाखवा असे कोर्टाने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.