नवी दिल्ली : शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यावरून मोठा कलह सुरू आहे. हा कहल थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने देखील शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते. पुरावे सादर करण्यासाठी ८ ऑगस्टची मुदत दिली होती. मात्र ही मुदत वाढविण्याची मागणी शिवसेनेने केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र ती टळली आहे. ठाकरे गटाकडून पुरावे सादर करण्यासाठी मुदत मागण्यात आली होती. या संदर्भात आयोगाला पत्र देण्यात आलं होतं. त्यानुसार निवडणूक आयोगाने ४ आठवड्याची मुदत दिली आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हासाठी वाद सुरू आहे. असून या संदर्भातील पाच याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत.राज्यात मागील काही दिवसांत झालेला सत्ताबदल आणि त्यामुळे निर्माण झालेला पेच सध्या सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांच्या खंडपीठातअंतर्गत राज्यातील पाच याचिका प्रलंबित आहे. यावर आतापर्यंत सुनावण्या झाल्या. मात्र ठोस निकाल आलेला नाही.
याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला देखील राज्यातील सत्तापेचावरून महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने न्यायालयातील याचिकांवर निकाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असं निर्देश दिले आहेत. आता सर्व याचिकांवर १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तसेच हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचं का? यावर देखील निर्णय होण्याची शक्यता आहे. तसे सुतोवाच सरन्यायाधीश रमना यांनी मागील सुनावणीत केले होते.