पुणे : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश राणेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी न्यायालयाने त्यांना हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध चाललेल्या एसीबी कारवाई विरुद्ध भास्कर जाधव यांनी निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी भाषणामध्ये भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश व नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्याचा आरोप करत भास्कर जाधव यांच्याविरोधात डेक्कन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात आमदार भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून हंगामी अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भास्कर जाधव यांच्या वकिलाचा युक्तीवाद मान्य करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी काही अटी व शर्तींवर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यातर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. हितेश सोनार, ॲड. संदीप जाधव यांनी काम पहिले.
भास्कर जाधव यांच्यावर पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, ५०५/१, ५०५/२, ५००, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात योगेश अरुण शिंगटे (रा.निगडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शिवसेना पक्षाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या भाषणात केले होते. हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.